भाग १: Sahyadri च्या डोंगरांत काय घडतंय?
महाराष्ट्रधर्म — अधिकृत शीर्षक गीत
🎬 संपूर्ण मालिका संग्रह (All Episodes)
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत झालेले सर्व भाग
Ujani धरणावर AI Data Centre चा प्लॅन, शेतकरी-मच्छीमारांमध्ये भीती, विरोध का होतोय?
हजारोंमध्ये एकाची निवड…तरीही लाखो तरुण याच परीक्षांच्या मागे का?
Sahyadri च्या डोंगरांत काय घडतंय?
'महाराष्ट्रधर्म' — केवळ चर्चा नाही, तर थेट वास्तव आणि उपाय!
'सत्यमेव जयते'च्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे वास्तव, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समस्यांवर थेट जमिनीवरून संशोधन करून सत्य समोर आणणारा आणि ठोस उपाय शोधणारा विचारप्रवर्तक मंच.
१. सत्यशोधन व जमिनीवरील वास्तव
केवळ स्टुडिओत बसून चर्चा न करता प्रत्यक्ष घटनास्थळावरून आकडेवारी, पुरावे आणि सत्य अनुभव समोर आणले जातात.
२. सामान्यांचा आवाज व संरक्षण
शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि नागरिकांना थेट व्यासपीठ. गैरप्रकार उघड करणाऱ्या व्हिसलब्लोअरची ओळख कुठेही प्रसिद्ध न करण्याची हमी.
३. केवळ टीका नाही, ठोस उपाय
केवळ समस्या मांडून न थांबता विचारवंत, तज्ज्ञ, नागरिक आणि प्रशासनाशी थेट संवाद साधून सकारात्मक तोडगा काढला जातो.
तुमच्याकडे भ्रष्टाचाराचे किंवा सामाजिक अन्यायाचे पुरावे आहेत?
आपली ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून आपण थेट कागदपत्रे, ऑडिओ, व्हिडिओ पुरावे आमच्या संशोधन टीमकडे पाठवू शकता. सत्य समोर आणण्यासाठी पुढे या!